
कुरुक्षेत्रावर रंगलं महाभारत! भाजप नेत्यासाठी तीन राज्यांचे पोलिस आमनेसामने
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (BJP) नेते तजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी (Punjab) शुक्रवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून अटक केली. प्रक्षोभक भाषणे करणे, धार्मिक द्वेष पसरवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे हे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांना अटक झाल्यानंतर आज पंजाब, हरयाणा आणि दिल्ली या तीन राज्यांचे पोलिस कुरुक्षेत्र इथं आमनेसामने आले होते. अखेर दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सोडवून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा: केजरीवालांना मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याला घरात घुसून अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvinde Kejriwal) यांना धमकावल्याच्या आरोपाखाली बग्गा यांना अटक करण्यात आली आहे, असे आम आदमी पक्षाचे आमदारांनी सांगितलं आहे. बग्गा यांना तपासात सहभागी होण्यासाठी पाच नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. पण, ते जाणीवपूर्वक तपास टाळत होते. त्यामुळे त्यांना आज त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली, असं पंजाब पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दिल्ली पोलिसांकडून पंजाब पोलिसांविरोधात अपहरणाचा गुन्हा -
तजिंदर बग्गा यांच्या वडिलांनी अपहरण झाल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दिली होती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांनी बग्गा यांना सोडविण्यासाठी पंजाबकडे धाव घेतली होती. इतकंच नाहीतर केंद्रशासित प्रदेश असलेल्या हरयाणाचे पोलिसांनी पंजाब पोलिसांचा ताफा कुरुक्षेत्रे इथं अडवून ठेवला होता. त्यानंतर दिल्ली पोलिस कुरुक्षेत्र इथं पोहोचले आणि बग्गा यांची पंजाब पोलिसांच्या ताफ्यातून सुटका करून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
Web Title: Delhi Police Leaves With Bjp Leader Tajinder Pal Singh Bagga From Kurukshetra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..