पीक जाळणे हे दिल्लीतील प्रदूषणाचे कारण

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पंजाब आणि हरियानामधील शेतात शेतकऱ्यांकडून जाळण्यात येणारे अनावश्‍यक पीक हेच दिल्लीतील प्रदूषणाचे कारण असल्याचे माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : पंजाब आणि हरियानामधील शेतात शेतकऱ्यांकडून जाळण्यात येणारे अनावश्‍यक पीक हेच दिल्लीतील प्रदूषणाचे कारण असल्याचे माहिती समोर आली आहे.

पंजाब आणि हरियानातील शेतकरी अनावश्‍यक पीके पेटवून देतात. त्यातून निर्माण होणाऱ्या दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून 1 नोव्हेंबरनंतर दिल्लीतील एकूण प्रदूषणापैकी 70 टक्के प्रदूषण हे त्याच कारणामुळे होत असल्याची माहिती हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या "सफर' या शासकीय संस्थेचे प्रकल्प संचालक गुफरान बेग यांनी दिली आहे. "सफर'च्या "केमिस्ट्री मॉडेल'द्वारे दिल्लीतील प्रदूषणाची बाह्य कारणे समोर आली आहे. "गेल्या पाच वर्षात प्रदूषणाची एवढी वाईट परिस्थिती राजधानी दिल्लीत नव्हती', अशी माहिती बेग यांनी दिली. "सफर'ने आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार हिवाळ्यात दिल्लीतील प्रदूषणापैकी बाह्य घटकांमुळे होणाऱ्या प्रदूषणचे प्रमाण हे 20 ते 35 टक्के एवढे होते, असेही बेग यांनी यावेळी सांगितले.

प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची उपाययोजना जाहीर केली आहे. त्यामध्ये तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही अपवाद वगळता जनरेटर्स वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय बांधकाम कामांवरही बंदी घालण्यात आली आहे.

 

Web Title: Delhi pollution main reason found