दिल्लीत प्रदूषणाची तीव्रता कायम

नवी दिल्ली - दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या मागणीसाठी रविवारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली - दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या मागणीसाठी रविवारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता आजदेखील कायम राहिल्याने पुन्हा एकदा राजधानीचा श्‍वास गुदमरला. दिल्लीतील अनेक ठिकाणांवर आज हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा धोक्‍याच्या पातळीवर पोचलेला होता. याचा मोठा फटका सार्वजनिक दळणवळणालाही बसला. तत्पूर्वी, शनिवारी वेगाने वाहणारे वारे आणि पावसामुळे प्रदूषणामध्ये थोडी घट झाली होती. दिल्लीमध्ये नव्याने येणाऱ्या वाऱ्यामुळे प्रदूषणकारी घटक येथे दाखल होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दिल्लीतील पुसा, बवाना, आनंदविहार, अशोकविहार, मुंडका आणि पंजाबीबाग या भागांतील हवेत मोठ्या प्रमाणावर विषारी घटक आढळून आले.

राजधानीलगतचा परिसर असणाऱ्या एनसीआर, नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडामध्ये हवेच्या प्रदूषणाची स्थिती अधिक गंभीर झाली होती. ‘नासा’ने आज टिपलेल्या छायाचित्रात पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालवर धुराचे गडद आच्छादन दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com