दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; मध्य आशियातसुद्धा धक्के

टीम ई सकाळ
Friday, 12 February 2021

दिल्लीसह पंजाब, उत्तराखंड यासह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे.

नवी दिल्ली - शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के राजधानी दिल्लीसह उत्तर भारताला बसले. यामध्ये भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. दिल्ली, अमृतसर यासह आजुबाजुच्या परिसरात भूकंपाचे हादरे काही सेकंदासाठी बसत होते. 

दिल्लीसह पंजाब, उत्तराखंड यासह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. यावेळी लोक घरातून भीतीने बाहेर आले होते. गेल्या महिन्यातही दिल्ली एनसीआरला भूकंपाचे धक्के बसले होते. 

भारतातच नाही तर मध्य आशियातही काही ठिकाणी भूकंप झाला. यामध्ये ताजिकिस्तानलासुद्धा साडेदहाच्या सुमारास 6.3 रिश्टर स्केलचा धक्का बसला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi punjab uttarakhand earthquake of magnitude 6 1 on the Richter scale