Delhi Court : दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदियांना दिलासा नाहीच, पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Sisodia

अबकारी धोरण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या सिसोदिया यांनी पत्नीची प्रकृती अस्वास्थ्य आणि मुलगा परदेशात असल्याचं कारण देत कोर्टात जामीन अर्जही सादर केला होता.

Delhi Court : दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदियांना दिलासा नाहीच, पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली : उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टानं (Delhi Rouse Avenue Court) सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 मेपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी न्यायालयानं सिसोदिया यांच्या कोठडीत 27 एप्रिलपर्यंत 10 दिवसांची वाढ केली होती.

ते पूर्ण झाल्यानंतर या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी वाढवली. अबकारी धोरण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या सिसोदिया यांनी पत्नीची प्रकृती अस्वास्थ्य आणि मुलगा परदेशात असल्याचं कारण देत कोर्टात जामीन अर्जही सादर केला होता.

सिसोदिया यांच्या पत्नीला 'ऑटोइम्यून डिसऑर्डर'चा त्रास असून त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सीमा सिसोदिया (वय 49) यांना इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आलं असून त्यांची तपासणी केली जात आहे.

दिल्लीतील कथित अबकारी धोरण प्रकरणात प्रदीर्घ चौकशीनंतर 26 फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. मनीष सध्या तिहार तुरुंगात आहेत. ईडी मद्य धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे.