आंदोलनात पैसे देऊन महिलांचा सहभाग; भाजपने शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

आंदोलनात पैसे देऊन महिलांचा सहभाग; भाजपने शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन पूर्णपणे काँग्रेस स्पॉन्सर्ड असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

भाजच्या आयटी सेलनं या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केलाय. आयटी सेलचे हेड अमित मालवीय यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे भाजपचा आरोप?
दिल्लीतील शाही बागमधील आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. तेथील आंदोलनात अभिनेता शाहरूख खानला ट्रोल करण्यात आल्यानंतर शाहीन बागचं आंदोलन आणखीनच प्रकाशझोतात आलं. या आंदोलनात अबाल वृद्धांनी सहभाग घेतला असून, कायद्यांच्या विरोधातील निदर्शनं सुरू केली आहेत. पण, हे आंदोलन पूर्णपणे काँग्रेस पुरस्कृत असून, आंदोलनात पैसे देऊन महिलांना आणलं जात असल्याचा आरोप भाजपनं केलाय.

अमित मालवीय यांनी हा आरोप करताना त्याचा पुरावादेखील दिला आहे. शाहीन बागमध्ये आंदोलन काँग्रेस पुरस्कृत आहे, अशी पोस्ट करून अमित मालवीय यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

अमित मालवीय यांच्या ट्वीटवरील व्हिडिओमध्ये एक तरुण शाहीन बागमधील आंदोलनाची माहिती देत आहे. आंदोलक महिलांना 500-1000 रुपये देऊन, आणले जात असल्याचं त्या तरुणानं सांगितलंय. जेवढा वेळ आंदोलनात सहभाग तेवढे जास्त पैसे, तसेच आंदोलकांना जेवण, पाणी जाग्यावर आणून दिलं जात आहे. कोणी आंदोलक महिला घरी जाणार असेल तर, तिच्या जागी दुसऱ्या मिहिलेला बसवलं जातं. पण, संख्याबळ कमी होऊ दिलं जात नाही, असं त्या तरुणानं सांगितलंय. 


देशभरात अशा स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही. जर, अशी ताकद असती तर, काँग्रेस गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाली नसती.
-सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com