दिल्ली-शिमला विमानाची सवलतीची तिकिटे 'बुक'

पीटीआय
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नव्याने सुरू झालेल्या सेवेला मोठा प्रतिसाद

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या "उडान' योजनेअंतर्गत सुरू झालेल्या शिमला आणि दिल्ली दरम्यानच्या विमान सेवेची सवलतीची जूनपर्यंतची सर्व तिकिटे बुक झाली आहेत. सवलतीच्या विमान तिकिटांचा दर 2 हजार 36 रुपये आहे.

सध्या या विमानाची तिकिटे विनासवलतीच्या दरात 5 हजार 300 ते 19 हजार 80 रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत, अशी माहिती एअर इंडियाची उपकंपनी अलायन्स एअरने दिली आहे. अलायन्स या विमानसेवेसाठी 42 आसनांचे विमान ठेवले आहे. आठवड्यातून पाच दिवस या मार्गावर हे विमान उड्डाण करणार आहे.

अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. सुबय्या म्हणाले, ""शिमला येथे जाण्याचा हा हंगाम असल्याने 2 हजार रुपयांच्या सवलतीच्या दरातील तिकिटांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. विमानातील दोन आसनांची तिकिटे सर्वाधिक 19 हजार रुपये दराने विकली गेली आहेत. दिल्लीहून शिमल्याला जाणाऱ्या विमानात 35 प्रवासी असतील. शिमल्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात 15 प्रवासी असणार आहेत. तेथील विमानतळावरील धावपट्टीची लांबी, तापमान आणि उंची यामुळे प्रवासी संख्या कमी ठेवण्यात आली आहे. विमानातील निम्मी तिकिटे सवलतीच्या दरात देण्यात येत आहेत.''

शिमला - दिल्ली विमानसेवा
- आठवड्यातून पाच दिवस सेवा
- सवलतीचा तिकीट दर 2 हजार 36 रुपये
- सर्वाधिक तिकीट दर 19 हजार रुपये
- प्रत्येक उड्डाणासाठी खर्च 4.06 लाख रुपये
- प्रत्येक उड्डाणातून उत्पन्न 2.64 लाख रुपये

Web Title: delhi-shimla air ticket