सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीला बनविणार पर्यटन स्थळ 

पीटीआय
सोमवार, 4 जून 2018

राजधानी दिल्लीला फेसबुक, ट्‌विटर यांसारख्या सोशल मीडियावर पर्यटन फ्रेंडली बनविण्यासाठी सोशल मीडिया एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला फेसबुक, ट्‌विटर यांसारख्या सोशल मीडियावर पर्यटन फ्रेंडली बनविण्यासाठी सोशल मीडिया एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. या संदर्भात दिल्ली सरकारच्या पर्यटन विभागाने एक आराखडा तयार केला असून, त्यातील एक सोशल मीडिया एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीला अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्याशिवाय स्मारके, बाजारपेठ, मंदिरे यांचा समावेश आहे; मात्र त्याचे योग्य पद्धतीने मार्केटिंग होणे आवश्‍यक आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील.

दिल्लीत अनेक स्मारके असल्याने ते ऐतिहासिक शहर आहे. या सोशल मीडियाच्या एजन्सीला सप्टेंबरपर्यंत काम देण्यात येईल. फेसबुक, ट्विटर, इन्ट्राग्राम आणि यू-ट्यूबवर दिल्लीली पर्यटनासाठी अनुकूल बनविण्याचे काम ही एजन्सी करणार आहे. सोशल मीडिया एजन्सी यासंदर्भात योजना आखेल आणि त्याच्या ब्रॅंडिंगचे कामही करेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

Web Title: Delhi tourist destination that will make through social media