दिल्लीच्या पर्यटकाचा गोव्यात बुडून मृत्यू

दिल्लीच्या पर्यटकाचा गोव्यात बुडून मृत्यू

सासष्टी : लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या अमित सेन गुप्ता (60 ) या दिल्लीच्या पर्यटकाचा आज दक्षिण गोव्यातील बेतलभाटी समुद्र किनारय़ावर बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजता घडली. 

कोलवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित सेन गुप्ता हा आपल्या पत्नीबरोबर लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगळवारी गोव्यात आला होता. बेतलभाटी येथील एका हॉटेलमध्ये हे जोडपे उतरले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास अमित सेन गुप्ता त सेन गुप्ता बेतलभाटी येथे समुद्रात किनारय़ावर पोहण्यासाठी गेला असता, त्याचा तिथे बुडून मृत्यू झाला. किनारय़ावर असलेल्या दृष्टीच्या जीवरक्षकांनी त्याला समुद्रातून बाहेर काढले. पण तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अनैसर्गिक मृत्यू अशी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com