Tractor Parade - पुष्पवृष्टीने स्वागत ते लाल किल्ल्यावर धडक; पाहा शेतकरी आंदोलनाचे फोटो

टीम ई सकाळ
Tuesday, 26 January 2021

केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली.

केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आक्रमक झालेले शेतकरी नियोजित मार्ग सोडून जिथं परवानगी दिलेली नाही अशा मार्गावरूनही गेले. शेतकरी आंदोलक दिल्लीतील लाल किल्ल्यावर पोहोचले

Image may contain: one or more people, people on stage, sky and outdoor, text that says "सकाळ"
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. नियोजित वेळेच्या आधीच सुरु झालेल्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दुपारच्या सुमारास गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले. 

tractor rally
सिंघु बॉर्डरवरून शेतकरी जसे पुढे निघाले तेव्हा दिल्लीतील स्वरुप नगर इथं त्यांच्यावर लोकांनी फुलांचा वर्षाव केला होता. इथं रस्त्यावर फुलांचा सडा पडलेलाही दिसला. 

 

Image may contain: one or more people and outdoor
ट्रॅक्टर रॅली जेव्हा लाल किल्ल्यावर पोहोचली तेव्हा गोंधळ झाला. परवानगी नसतानाही मार्ग बदलल्यानं आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 

 

Image may contain: outdoor
दरम्यान, एका ठिकाणी ट्रॅक्टर पलटी झाल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तेव्हा तासभर मृतदेहासह आंदोलन करण्यात आलं. 

 

Image may contain: one or more people, people standing, people walking, people on stage and outdoor
ट्रॅक्टर रॅली पांडव नगर इथं पोहोचली तेव्हा पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. संजय गांधी ट्रान्सपोर्टनगर जवळ पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. 

Image may contain: 2 people, including Er Sunny Kamble, outdoor
शेतकऱ्यांनी सिंघु, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड् तोडले. या रॅलीत अनेक ठिकाणी हिंसक वळणही लागले होते. 

Image may contain: one or more people, crowd and outdoor, text that says "पकाळ F"
सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड हटवला. तसंच पोलिसांनी रस्ता रोखण्यासाठी उभा केलेल्या गाड्या ट्रॅक्टरने ढकलून देण्यात आले.

Image may contain: 6 people, people standing, people on stage and outdoor
आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी नंग्या तलवारी नाचवल्यानं हे शेतकरीच आहेत का असाही प्रश्न सोशल मीडियावरुन उपस्थित करण्यात आला. 

 

Image may contain: one or more people, people on stage and outdoor, text that says "सकाळ ua F00D"
शेतकऱ्यांच्या रॅलीची सुरुवात फुले उधळून झाली पण दुपारी काही काळ पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा माराही करण्यात आला. 

Image may contain: sky, text that says "सकाळ"
आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यात प्रवेश केला होता. तसंच किल्ल्याच्या घुमटावर शीखांचा झेंडा फडकावला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi tractor parade farmers protest violence red fort flag