
Delhi Crime : Live-In पार्टनरने महिलेला तेल टाकून पेटवलं; कारण ठरले ड्रग्ज
दिल्लीमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या पार्टनरने तिला पेटवलं, आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
या दोघांमध्ये ड्रग्जवरुन वाद झाल्याचं दिल्लीच्या अमन विहार इथल्या पोलिसांनी सांगितलं आहे. ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, एसजीएम रुग्णालयामध्ये भाजल्यामुळे जखमी झालेली एक महिला दाखल झाली आहे. जेव्हा पोलीस रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे तिचा जबाब नोंदवता आला नाही.
काही वेळानंतर या महिलेची ओळख पटली. ही महिला दिल्लीतल्या बलबीर विहार इथं राहत होती. ती एक चप्पलच्या कारखान्यामध्ये काम करत होती. ही महिला आपल्या पतीसोबत राहत नव्हती. गेल्या सहा महिन्यांपासून ती आरोपी मोहित याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती.
या महिलेला एक तिच्या पतीपासून तर दुसरं मोहितपासून अशी दोन मुलंही आहेत. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिचा जबाब नोंदवता आला नाही. सोमवारी रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला. तिच्या परिवारातल्या सदस्यांच्या जबाबानुसार, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० फेब्रुवारी रोजी या महिलेचं आणि मोहितचं १० फेब्रुवारीला रात्री कडाक्याचं भांडण झालं. या महिलेने मोहितला त्याच्या मित्राच्या घरी ड्रग्ज घेताना पकडलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने या महिलेवर तारपीन तेल ओतलं आणि तिला पेटवलं, असंही पोलिसांनी सांगितलं. मोहितला सध्या ताब्यात घेण्यात आलं आहे.