धावत्या मोटारीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

नवी दिल्ली- एका सव्वीस वर्षीय महिलेवर तिघांनी धावत्या मोटारीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीम येथील महिला आपल्या गावी निघाली होती. तिघांनी तिचे अपहरण करून धावत्या मोटारीमध्ये सामूहिक बलात्कार केला. तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल अद्याप हाती आलेला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'तिघांनी माझे अपहरण केले त्यावेळी त्यांनी दारू प्यायलेली होती. धावत्या मोटारीमध्ये माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर मला ठारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु, त्यांच्या तावडीतून सुटका झाल्याने बचावले आहे.'

Web Title: Delhi: woman gangraped in moving car