स्मार्टफोन वेळेत न मिळाल्याने डिलिव्हरी बॉयवर चाकू हल्ला

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली : ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या संकेतस्थळावरून तुम्ही नियमित खरेदी करता काय. फोनवर ऑर्डर दिल्यानंतर ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून ती मिळण्यास विलंब झाला आहे, असे किती वेळा झाले आहे. जर तुम्हाला ऑर्डर मिळण्यास विलंब झाला तर काय तुम्ही त्याला जखमी करणार काय? 

मात्र, दिल्लीतील एका महिलेने हे कृत्य केले आहे. येथील एका 30 वर्षीय महिलेने स्मार्टफोनची ऑर्डर फ्लिपकार्टला दिली होती. मात्र, फोन वेळेत तिला न मिळाल्याने ती खूप संतप्त झाली आणि रागाच्याभरात तिने फोनची डिलिव्हरी करण्यास आलेल्या युवकावर चाकूने हल्ला केला. 

कमल दीप असे या महिलेचे नाव आहे. तिने रागाच्याभरात केशव (वय 28) या डिलिव्हरी बॉयवर चाकूने हल्ला केला. येथील निहाल विहार येथे ही घटना घडली. फ्लिपकार्टवरून खरेदी केलेल्या स्मार्टफोनची डिलिव्हरीला उशीर केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कमल दीप आणि तिचा भाऊ जितेंद्र सिंह यांना अटक केली आहे. 

केशवला पोलिसांनी संजय गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. चंदन विहार भागातील नाल्याजवळ जखमी अवस्थेत युवक पडल्याची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी केशव हा निहाल विहार येथील रहिवासी आहे. 24 मार्च रोजी केशवने आपला जबाब नोंदविला आहे. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजचीही मदत झाली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Delhi women stabs Flipkart delivery boy for delayed delivery