esakal | स्टंट करणं युट्युबरला पडलं महागात; पाळीव श्वानाला फुग्यासोबत बांधलं अन्..
sakal

बोलून बातमी शोधा

स्टंट करणं युट्युबरला पडलं महागात

स्टंट करणं युट्युबरला पडलं महागात

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सोशल मीडियावर अनेकदा युट्युबर त्यांच्या चित्रविचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येत असतात. मात्र, कुत्र्यासोबत स्टंट करणं एका युट्युबरला चांगलंच महागात पडलं आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या युट्युबरवर कारवाई केली असून त्याला अटक केली आहे. (delhi-youtuber-arrested-for-making-dog-fly-using-balloons)

गौरव जॉन असं अटक करण्यात आलेल्या युट्युबरचं नाव असून त्याने पाळीव श्वानाला हायड्रोजनच्या फुग्यांसोबत बांधून हवेत तरंगत ठेवलं होतं. सोबतच त्याने हा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत या युट्युबरला अटक केली आहे.

हेही वाचा: निराधार! मुलांनी पाठ फिरवल्यानंतर वृद्धावर आली 'ही' वेळ

गौरवने पाळीव श्वानासोबत केलेल्या कृत्यावर PFA या प्राणी संस्थेने आक्षेप घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पाळीव प्राण्याला क्रुरतेने वागणूक दिल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर गौरवने युट्युबवरुन हा व्हिडीओ डिलीट केला आहे.

दरम्यान, गौरव आणि त्याच्या आईविरोधात कलम १८८,२६९, ३४ आणि पशू क्रुरता अधिनियमाअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.