विष्णू वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पणजी : माजी उपसभापती विष्णू वाघ यांच्या दक्षिण आप्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला मृत्यू हा संशयास्पद आहे. त्याची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांचे बंधू  प्रा. रामराव वाघ यांनी केली आहे. भावाच्या मृत्यूबाबत अद्याप आपणास कोणी अधिकृतरीत्या कळवलेही नाही असे ते म्हणाले.

त्यांनी सांगितले, की काल रात्री पत्रकारांनीच मला दूरध्वनीवर विष्णू यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मी वाघ यांच्या संपर्कात असणाऱ्यांकडे आणि त्यांच्याकडे कामाला असणाऱ्यांकडे चौकशी केली. त्यापैकी एकाने ८ रोजीच आपणास समजले होते पण कोणाला सांगू नको असे बजावले होते. दुसऱ्याने ११ रोजी मृत्यू झाला त्यावेळी एका नातेवाईकासह जाऊन ढवळीच्या बंगल्यात साफसफाई केली. त्यावेळी तो नातेवाईक हळू आवाजात मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. काहींनी विष्णू यांना दक्षिण अाफ्रिकेत नेताना त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे विदेशात नेण्याचा निर्णय कोणी व का घेतला याची चौकशी होणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, या प्रकरणाची सरकारकडे मागणी करायची की पोलिसात तक्रार करायची याचा निर्णय आम्ही कुटुंबिय आज सायंकाळपर्यंत घेणार आहोत. त्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जोहान्सबर्ग येथे अशी कोणते वैद्यकीय उपचार केले जाणार होते याचीही चौकशी झालीच पाहिजे याशिवाय विष्णू यांचा मृत्यू कशामुळे झाला व मृत्यू झाल्याचे पाच दिवस दडवून का ठेवले हे सारे संशयास्पद आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of inquiry of Vishnu Wagh death

टॅग्स