
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) याचिका दाखल करणार आहे.
लखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) याचिका दाखल करणार आहे.
आनंदाच्या क्षणी भाऊ नाही विसरला भावाला! मातोश्रीकडून निमंत्रण
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात 9 डिसेंबर पूर्वीच ही पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय एआयएमपीएलबीने बुधवारी घेतला असून याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली. सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला होता. मात्र, बुधवारी एआयएमपीएलबीने जाहीर केले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बोर्ड आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
एआयएमपीएलबीचे सचिव आणि वरिष्ठ वकिल जाफरयाब जिलानी यांनी सांगितले, की सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल न करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा पर्सनल लॉ बोर्डावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. मुस्लिम संघटनांमध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबतीत एकमत आहे. त्यामुळे आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला अयोध्येतच मशिदीसाठी पाच एकर जमीन देण्याच्या आदेशावर आणखी एका बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल असे बोर्डाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.