लोकशाहीची सर्वांत अंधकारमय वाटचाल- राहुल

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

राहुल गांधी म्हणाले, 'टीव्ही वाहिन्यांना शिक्षा देण्यात आहे, आणि त्यांना बंद करण्यास सांगितले जात आहे. सरकारला याबद्दल जबाबदार धरणाऱ्या विरोधकांना अटक करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीचा हा सर्वांत अंधकारमय काळ आहे.'
 

नवी दिल्ली- सत्तापीपासू सरकारमुळे सर्वांत अंधकारमय काळातून लोकशाहीची वाटचाल सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

हुतात्म्यांसाठी प्रार्थना करून अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसल्याने राहुल यांनी प्रथम काँग्रेस समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. 

"मोदी सरकार हे सत्तेमध्ये धुंद झाले आहे. जे सरकारशी असहमत असतील त्यांना गप्प करण्यात येते. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये संसदेने केलेल्या कायद्यांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. भूसंपादन कायदा आणि रिअल ईस्टेटसंबंधी कायद्यांचे उल्लंघन हे याचे उदाहरण आहे," असे त्यांनी सांगितले. 
राहुल गांधी म्हणाले, "प्रश्न विचारणे हे या सरकारला सर्वांत जास्त अस्वस्थ करते, कारण त्यांच्याकडे उत्तरे नाहीत."
 

Web Title: democracy going through darkest time- rahul gandhi