कर्नाटकात लालसेचा विजय झाला : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार स्थापन झाल्यापासूनच बाहेरून किंवा आतून त्याला लक्ष्य केले जात होते. काही जण या कर्नाटकातल्या काँग्रेस-जेडीएसच्या सरकारला धोक्याच्या स्वरूपात पाहत होते. त्यांनीच हे सरकार पाडण्यासाठी अनेक अडथळे आणले. अखेर लालसेचा विजय झाला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकात घडलेल्या सत्ता नाट्यावर भाष्य करताना म्हटले आहे, की येथे लालसेचा विजय झाला असून, लोकशाही, विश्वासहर्ता आणि कर्नाटकातील नागरिकांचा पराभव झाला आहे.

कर्नाटकात मंगळवारी रात्री झालेल्या विश्वासदर्शक ठरावात काँग्रेस-जेडीएसचे सरकार बहुमत मिळविण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे काँग्रेसचे सरकार कोसळले असून, भाजपचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 

राहुल गांधी म्हणाले, की कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार स्थापन झाल्यापासूनच बाहेरून किंवा आतून त्याला लक्ष्य केले जात होते. काही जण या कर्नाटकातल्या काँग्रेस-जेडीएसच्या सरकारला धोक्याच्या स्वरूपात पाहत होते. त्यांनीच हे सरकार पाडण्यासाठी अनेक अडथळे आणले. अखेर लालसेचा विजय झाला.  

दुसरीकडे प्रियंका गांधींनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. सगळेच खरेदी करता येत नाही. प्रत्येकाची बोली लावली जात नाही. खोट्या गोष्टी एक ना एक दिवस उघड्या पडतात हे भाजपच्या लवकरच लक्षात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Democracy honesty and people of Karnataka lost says Rahul Gandhi