'त्यांना' लाज वाटली पाहिजे- डोनाल्ड ट्रम्प

रॉयटर्स
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल सॅली येट्स यांची काल हकालपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हाईट हाऊसच्या वतीने या नव्या नामांकनाबाबत माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. 

वॉशिंग्टन- डेमॉक्रॅटिक लोक आम्हाला आमचा अॅटर्नी जनरल आणि उर्वरित कॅबिनेट कधी देणार! त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे नवे अॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांची अॅटर्नी जनरल पदावर नियुक्ती करण्यासाठी न्याय विभागाला सिनेटच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. दरम्यान, डेप्युटी अॅटर्नी जनरल म्हणून अॅटर्नी रॉड रोझेंस्टाईन यांच्या नावाचे नामाकंन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करणार आहेत. 

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल सॅली येट्स यांची काल हकालपट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हाईट हाऊसच्या वतीने या नव्या नामांकनाबाबत माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी वरील वक्तव्य केले आहे. व्हाईट हाऊसचे कामकाज चालले नाही यात काही आश्चर्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 
ट्रम्प यांच्या स्थलांतर आणि निर्वासितांबाबतच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यास, तसेच त्याचा न्यायालयात बचाव करण्यास येट्स यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे.  

सहयोगी अॅटर्नी जनरल म्हणून रॅचेल ब्रँड यांची, तर सहायक अॅटर्नी जनरल म्हणून स्टीवन इंगेल यांचे नामांकनही अध्यक्ष ट्रम्प करतील असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. 
 

Web Title: democrats should be ashamed of themselves, says donald trump