नोटाबंदी म्हणजे आर्थिक दरोडा : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

अलमोरा : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नोटाबंदी हा निर्णय काळा पैसा किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध नव्हता, तर हा आर्थिक दरोडा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अलमोरा : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. नोटाबंदी हा निर्णय काळा पैसा किंवा भ्रष्टाचाराविरुद्ध नव्हता, तर हा आर्थिक दरोडा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उत्तराखंडमधील अलमोरा येथील जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, 'भारतातून भ्रष्टाचार नाहीसा व्हावा असे काँग्रेसला वाटते. त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक उपाययोजनेला आमचा पाठिंबा आहे. मात्र, नोटाबंदी ही भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा काळ्या पैशाविरुद्ध नसून तो आर्थिक दरोडा आहे. मोदी शेतकऱ्यांचे ऐकून घेत नाहीत. पण ते श्रीमंत लोकांचे 1.40 लाख कोटी रुपये माफ करतात, पण ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाहीत. तुम्ही देशाला दोन भागात विभागले आहे. एका बाजूला देशातील 60 अतिश्रीमंत कुटुंबे आणि दुसरीकडे गरीब, शेतकरी, प्रामाणिक लोकांचा उर्वरित 99 टक्के भारत.'

ते पुढे म्हणाले, "संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात 1 टक्के भारतीयांकडे 60 टक्के संपत्ती होती. सध्या केवळ 6 टक्के काळा पैसा रोखीच्या स्वरुपात आहे. मला एक कळत नाही की हे 6 टक्‍क्‍याचा काळा पैसा हे मोदींचे उद्दिष्ट आहे का? उर्वरित 94 टक्के नाही? मी त्यांना सांगू इच्छितो की जरा गरीब लोकांकडे बघा. तुम्ही प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये टाकणार होता. मात्र तुम्ही विजय मल्ल्या यांना 1200 कोटी दिले.'

Web Title: Demonetisation is economic robbery : Rahul Gandhi