नोटाबंदीच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ: लालूप्रसाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पाटना (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे केवळ गरीबांच्या त्रासामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे म्हटले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. नोटाबंदीला विरोध करण्यासाठी आमचे मंत्री आणि पक्ष रॅली काढणार आहेत. या 50 दिवसांमध्ये लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनातील नोटा कागदाचा तुकडा झाल्या आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. परिस्थिती सामान्य होईल असा खोटा दावा मोदी करत आहेत. आता देशातील जनतेचा मोदींवर विश्‍वास राहिलेला नाही.'

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसत असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर एकही वाईट घटना घडली नसल्याचा दावा करत या निर्णयाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले. 'रिझर्व्ह बँककडे पुरेसे चलन उपलब्ध आहे. जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत आणि पाचशेच्या जास्तीत जास्त नोटा पुरविण्यात आल्या आहेत', असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Demonetisation only increasing people's suffering: Lalu