नोटाबंदीची काही गरजच नव्हती: डॉ. मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नोटबंदीचा निर्णय घेण्याची अजिबात गरज नव्हती. त्यामुळे नोटाबंदी सारखा साहसी निर्णय का घेण्यात आला हा देखील एक प्रश्न आहे.

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या गरज नव्हती, तसेच या अनावश्यक निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला असल्याचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.

मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीबाबत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ''नोटबंदीची तांत्रिक आणि आर्थिकदृष्या अजिबात आवश्यक नव्हती. जगभरात काही देशांचा अपवाद वगळता म्हणजे लॅटिन अमेरिका अशा काही देशांना वगळता कुठेही नोटाबंदी यशस्वी झाली नाही.'' ते इंडियन स्कूल ऑफ बिझनेस लीडरशिपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नोटबंदीचा निर्णय घेण्याची अजिबात गरज नव्हती. त्यामुळे नोटाबंदी सारखा साहसी निर्णय का घेण्यात आला हा देखील एक प्रश्न आहे.

Web Title: Demonetisation was not required at all: Manmohan Singh