नोटाबंदीमुळे शेतकरी, मजुरांना फायदा होईल: मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भारत व मजूरांना फायदा होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केले. यावेळी पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयास एका "यज्ञा'ची उपमा दिली.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयाचा ग्रामीण भारत व मजूरांना फायदा होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केले. यावेळी पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयास एका "यज्ञा'ची उपमा दिली.

"भ्रष्टाचार, दहशतवाद आणि काळ्या धनाविरोधात देशात सध्या सुरु असलेल्या
यज्ञामध्ये सहभागी झालेल्या भारतीय जनतेस माझे नमन आहे. आपल्या देशाचा आर्थिक कणा असलेले शेतकरी, कामगार आणि व्यापारी यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. आता ग्रामीण भारताच्या समृद्धी व विकासाची प्रक्रिया भ्रष्टाचार व काळ्या धनामुळे थांबणार नाही. आमच्या गावांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावयासच हवा,'' असे पंतप्रधान म्हणाले.

नोटाबंदीचा हा निर्णय भारतास कॅशलेस, तांत्रिकदृष्टया प्रगत बनविण्यासाठीची "ऐतिहासिक संधी' असल्याचे ठाम मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

""माझ्या तरुण मित्रांनो, भारतास भ्रष्टाचारमुक्त बनविण्याच्या या प्रक्रियेमध्ये तुम्ही बदलाचे दूत ठरणार आहात. भारताने काळ्या धनास पराभूत करण्याची खबरदारी आपणांस घ्यावयाची आहे. या निर्णयामुळे देशातील गरीब, नव मधमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि येणाऱ्या पिढ्यांना फायदा होणार आहे,'' असे मोदी यांनी सांगितले.

या निर्णयामुळे काही काळासाठी त्रास होणार असला; तरी दीर्घकालीन फायदा होणार असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

Web Title: demonetisation will help farmers, labourers, says PM