रामदेव बाबा म्हणतात, 'नोटाबंदीत पाच लाख कोटींचा गैरव्यवहार'

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मे 2019

- नोटाबंदीच्या काळात झाला तीन ते पाच लाख कोटींचा गैरव्यवहार.

नवी दिल्ली : नोटाबंदीवरून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. असे असताना आता योगगुरु रामदेव बाबा यांनी नोटाबंदीत तीन ते पाच लाख कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, बँकेवाले किती बेईमान असतील, याचा विचार पंतप्रधान मोदींनी कधीही केला नसेल. त्यामुळे मला आता असे वाटते, की बँकवाल्यांनी नोटाबंदीच्या काळात लाखो कोटींची लूट केली. हा गैरव्यवहार सुमारे तीन ते पाच लाख कोटींचा असण्याची शक्यता आहे. तसेच रामदेव बाबा यांनी या गैरव्यवहारासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

तसेच नोटाबंदीनंतर एका सीरीजच्या दोन नोटा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यातून हे सिद्ध होते, की देशाच्या अर्थव्यवस्थेवर हा मोठा हल्ला आहे. नोटाबंदीच्या काळात रोख रकमेची कमतरता नव्हती. मात्र, ही संपूर्ण रोख रक्कम बेईमान लोकांना सोपविण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Demonetization 3 to 5 lakh fraud says Ramdev Baba