नोटाबंदी हा सर्वांत मोठा गैरव्यवहार: कॉंग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मोदी यांनी नोटाबंदी नव्हे; तर देशबंदीच लागू केली आहे. घाईगडबडीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सर्व देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे.
नोटाबंदी हा स्वतंत्र भारतामधील सर्वांत मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय भाषणबाजी थांबवून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांचे नोटाबंदीच्या घोषित निर्णयाआधील आर्थिक व्यवहारही उघड करावेत, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

सुरजेवाला म्हणाले -

# मोदी यांनी नोटाबंदी नव्हे; तर देशबंदीच लागू केली आहे. घाईगडबडीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सर्व देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे.

# नोटाबंदी हा स्वतंत्र भारतामधील सर्वांत मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे.

# देशातील हुकूमशाही राजवटीने घेतलेल्या या निर्णयामुळे जनतेचे अविरत हाल होत आहेत

# नोटाबंदीनंतर नव्हे; तर भाजप व संघाने त्याआधीचे आर्थिक व्यवहार सार्वजनिक करण्याचे साहस दाखवावे

# पाशवी संख्याबळामुळे मोदी यांना देशातील 125 कोटी नागरिकांचे हाल व त्यांचा संताप दिसेनासा झाला आहे.

नी नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता भाजपच्या खासदार व आमदारांना 8 नोव्हेंबरनंतर खात्यावरून करण्यात आलेल्या सर्व व्यवहारांचा हिशोब देण्याचे आदेश दिले आहेत. मोदींनी पक्षाच्या देशभरातील सर्व खासदार आणि आमदारांच्या बँक खात्यावर 8 ते 31 डिसेंबरदरम्यान पार पडणाऱ्या व्यवहारांचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: demonetization is the biggest scam, says Surjewala