बॅंकेतून मिळाली पंधरा किलोची "कॅश'

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - खातेदारांना पैसे देताना बॅंकेतील नोटा संपल्या तरीही येथील बॅंक अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला वीस हजार रुपये अदा केले; मात्र ते दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात! यामुळे बॅंकेतून बाहेर पडताना या खातेदाराकडे तब्बल 15 किलो "कॅश' होती.

इम्तिायाज आलम असे या खातेदाराचे नाव असून, ते शनिवारी त्यांच्याकडील पाचशे आणि एक हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी गेले होते. तब्बल चार तास रांगेत थांबल्यानंतर त्यांचा नंबर आला. मात्र, बॅंकेत रक्कम नसल्याने केवळ दोनच हजार देऊ शकत असल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पैशांची अत्यंत निकड असल्याचे आलम यांनी सांगितल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर दहा रुपयांच्या नाण्यांचा पर्याय ठेवला. त्यामुळे वजन भरपूर होणार असले तरी गरज असल्याने आणि हे पैसे बाजारात चालत असल्याने मी ते स्वीकारले, असे आलम यांनी सांगितले.

Web Title: demonitisation problem continues in New Delhi

टॅग्स