दिल्लीत दाट धुके; हवाई वाहतुकीवर परिणाम

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, सोनीपत येथेही धुक्याचे साम्राज्य आहे. दिल्ली-गुडगाव द्रुतगती मार्गावर अपघात झाल्याचेही वृत्त आहे. उत्तर प्रदेश, हरियाना आणि पंजाबमध्ये तापमानाचा पारा उतरला आहे. 

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी दाट धुके असल्याने, याचा परिणाम हवाई, रेल्वे व रस्ता वाहतुकीवर झाला.

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरची दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी असल्याने सुमारे अनेक उड्डाणे वेळेवर होऊ शकली नाहीत. पहाटे तीन वाजल्यापासून दाट धुके असल्याने विमानांची उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून, अनेक गाड्या उशीराने धावत आहेत. रस्ता वाहतुकीलाही धुक्याचा मोठा फटका बसला आहे.

दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, सोनीपत येथेही धुक्याचे साम्राज्य आहे. दिल्ली-गुडगाव द्रुतगती मार्गावर अपघात झाल्याचेही वृत्त आहे. उत्तर प्रदेश, हरियाना आणि पंजाबमध्ये तापमानाचा पारा उतरला आहे. 

Web Title: Dense fog engulfs Delhi, North India; flights operations affected