अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती सरकारने रोखली

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागातील ज्येष्ठ अधिकारी मधू महाजन यांची केंद्र सरकारमधील प्रतिनियुक्ती रोखण्यात आली आहे.

महाजन यांची केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महिला आयोगामध्ये प्रतिनियुक्तीवर जाणार होत्या. त्या प्रतिनियुक्तीवर जाण्यास अपयशी ठरल्याने पुढील वर्षी त्यांच्या निवृत्तीपर्यंत प्रतिनियुक्ती रोखण्यात आली आहे. महाजन या 1982 च्या तुकडीच्या भारतीय महसूल सेवेच्या अधिकारी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत महाजन यांची प्रतिनियुक्ती रोखण्याला मंजुरी देण्यात आली आहे. महाजन या 30 सप्टेंबर 2018 रोजी निवृत्त होत असून, त्यांची प्रतिनियुक्ती निृवत्तीपर्यंत केंद्र सरकारमध्ये करण्याचा आदेश मनुष्यबळ मंत्रालयाने दिला होता. महाजन यांची गेल्या महिन्यात महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव म्हणून निवड करण्यात आली होती.

Web Title: deputation of officer madhu mahajan halted