
Tejashwi Yadav Spouse : लालू प्रसादांना का आवडली नव्हती नवी सुन? एअर होस्टेस होती तेजस्वी यादवांची पत्नी
Tejashwi Yadav Spouse : सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना आज दुसरे समन्स बजावले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन दिल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी त्यांना ४ फेब्रुवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते.
ईडीने देखील तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण देशभरात चांगलचं गाजतयं. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात तेजस्वी यादव यांच्या पत्नी सुद्धा चर्चेचा विषय ठरल्या. (Deputy Chief of Bihar Tejashwi Yadav Spouse Rajshree Yadav, know about her)
आज सीबीआयने तेजस्वी यादव यांना आज दुसरे समन्स बजावल्यानंतर त्यांच्या पत्नी चौकशीसाठी येऊ शकल्या नाही कारण त्या गर्भवती आहे आणि काल ईडीच्या छाप्यानंतर त्यांच्या पत्नीला दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही बातमी समोर आली आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का तेजस्वी यादव यांची पत्नी कोण आहे? आज आपण त्यांच्याविषयीच जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया.
तेजस्वी यादव यांचं लग्न चर्चेत का होतं?
तेजस्वी यादव यांच्या पत्नीचं नाव राजश्री असून सध्या त्या प्रेग्नंट आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तेजस्वी यादव आणि राजश्री लग्नबंधनात अडकले होते पण त्यावेळी त्यांचा विवाह चर्चेचा विषय होता. तेजस्वी यादव यांनी त्यांचं लग्न अत्यंत साधारणपणे केलं. त्यांनी खूप कमी लोकांना लग्नासाठी आमंत्रित केलं होतं
त्यांच्या विवाहाची चर्चा होण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे तेजस्वी यादव हे हिंदू धर्माचे होते मात्र त्यांच्या पत्नी या ख्रिश्चन धर्माच्या होत्या.
कोण आहे तेजस्वी यादवची पत्नी?
तेजस्वी यांच्या पत्नीचं नाव एलेक्सिस उर्फ राशेल गोडिन्हो (Rachel Godinho) आहे. ल लग्नानंतर त्यांचं नाव बदलण्याल आलं. राजेश्वरी यादव असं ठेवण्यात आलं. राजेश्वरी यादव यांचा जन्म हरियाणा आहे मात्र त्या अनेक वर्षांपासून दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी मध्ये राहायच्या. त्यांचे वडिल चंडीगढ येथे एका स्कूल मध्ये प्रिंसिपल होते.
तेजस्वी यादव यांच्या पत्नी एक एअर होस्टेस होत्या. तेजस्वी आणि एलेक्सिस (राजेश्वरी यादव) यांच्यात खूप चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. असं म्हणतात एलेक्सिस या ख्रिश्चन धर्माच्या असल्याने लालू प्रसाद यादव या लग्नासाठी तयार नव्हते. मात्र मुलाच्या इच्छेसमोर त्यांनी लग्नाला होकार दिला.