छत्रपती वंशवळीतील विक्रमसिंह राजाराम राजेभोसलेंचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

तंजावर येथील थोरला राजमहाल, हुजूर महाडी त्यांच्या अधिपत्याखाली होता. कला, संस्कृती, समाजकारण आणि समाज उत्थानाचा थेट वारसा त्यांना जणू परंपरागत लाभला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी मंदिर उभारणी, शाळेसाठी मदत, गरिबांना मदत अशी अनेक समाज उभारणीची कामं केली होती.

चेन्नई : श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू आणि तंजावर,तामिळनाडू येथील पहिले मराठा छत्रपती श्रीमंत व्यंकोजी राजे यांचे थेट बारावे वंशज असलेले श्रीमंत विक्रमसिंह राजाराम राजेभोसले यांचे आज चेन्नई येथे वयाचे ऐंशी काळात वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले युवराज प्रताप सिंह, युवराज मालोजी राजे आणि दोन मुली राजलक्ष्मी राजेश राजेशिर्के, अरुणाराजे कृष्णराजे महाडिक आणि त्यांची पत्नी मधुमाला असा परिवार आहे.

तंजावर येथील थोरला राजमहाल, हुजूर महाडी त्यांच्या अधिपत्याखाली होता. कला, संस्कृती, समाजकारण आणि समाज उत्थानाचा थेट वारसा त्यांना जणू परंपरागत लाभला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी मंदिर उभारणी, शाळेसाठी मदत, गरिबांना मदत अशी अनेक समाज उभारणीची कामं केली होती.

सध्याचे तंजावर छत्रपती श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांचे ते सख्खे काका आणि समस्त तंजावर भोसले परिवाराचे ते आधारवड आणि मार्गदर्शक होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: descendant of Vyankoji Maharaj VikramSinha raje passes away in Chennai