Tiger Census News : वाघांची खरी संख्या किती ? मोदींच्या उपस्थितीत होणार घोषणा, आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुहूर्त Desh tigers number international conference narendra modi | Latest Marathi News | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra modi

Tiger Census News : वाघांची खरी संख्या किती ? मोदींच्या उपस्थितीत होणार घोषणा, आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुहूर्त

Tiger Census News : बहुप्रतीक्षित अखिल भारतीय व्याघ्रगणनेचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ एप्रिल रोजी म्हैसूर येथे प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे.

व्याघ्र प्रकल्प घोषणेला ५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान एप्रिलमध्ये म्हैसूरला भेट देणार असून त्यात ही संख्या जाहीर करणार आहे.

पंतप्रधानांची नुकतीच दावणगिरी येथे जाहीर सभा झाली. त्यात कर्नाटक येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याघ्रगणनेचा अहवाल घोषित केला जाईल असेही संकेत त्यांनी दिले आहेत.

त्यामुळे ९ एप्रिलला “व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहेत. भारतातील वाघांची संख्या नेमकी किती याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते.

यंदा चंद्रपूर येथे २९ जुलैला व्याघ्रदिनाचा राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रम झाला. त्यात आकडेवारी जाहीर होईल असे बोलले जात होते. मात्र, काही राज्यांची आकडेवारी प्राप्त न झाल्याने तो मुहूर्त हुकला होता.

आता प्रतिक्षा संपली आहे. याच परिषदेत वाघांचे ५० रुपयाचे नाणे देखील प्रसिद्ध केले जाणार आहे. जगभरातील व्याघ्रसंख्येच्या ७० टक्के वाघ भारतात आहेत. वाघांच्या संख्या वाढीचा दर हा वार्षिक सहा टक्के आहे.

२००६ ते २०१८ या बारा वर्षांच्या कालावधीत भारताने व्याघ्रसंवर्धनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यामुळे संख्या दुप्पट झाली. मध्य प्रदेश (५२६) आणि कर्नाटक (५२४) या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत. दोन्ही राज्य वाघांच्या संवर्धनाच्या निमित्ताने स्पर्धक म्हणून पुढे येऊ लागले आहे.

२०१८ मध्ये झालेल्या गणनेत देशात २ हजार ९६२ वाघ असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा ३० टक्के वाघांची संख्या वाढली होती. यंदा वाघाच्या संख्येत अंदाजे ३० ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजे ४५०० ते ४७०० पर्यंत वाघांची संख्या जाईल असे सूत्रांनी सांगितले.

वाघ जाणार कंबोडियात !

भारतातून कंबोडियामध्ये वाघांना नेण्याची योजना आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत वाघाचे अस्तित्व असलेले भारतासह १३ देशाचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. कंबोडियामध्ये २००९ मध्ये वाघ पूर्णपणे नामशेष झाले. भारत आणि कंबोडियामध्ये वाघाच्या स्थलांतरणाचा एक करार करण्यात आला आहे.