Loksabha 2019 : काँग्रेसकडे दहा जागांची मागणी : देवगौडा 

Loksabha 2019 : काँग्रेसकडे दहा जागांची मागणी : देवगौडा 

नवी दिल्ली (पीटीआय) : आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित होण्याअगोदरच राजकीय पक्षांतील घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटकातील जेडीएसचे नेते एच. डी. देवेगौडा यांनी लोकसभेसाठी कर्नाटकातील 28 पैकी 10 जागांची मागणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. यापूर्वी जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी बारा जागांची मागणी केली होती. 

जेडीएस नेते एच. डी. देवेगौडा आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात आज सकाळी दहाच्या सुमारास निवासस्थानी कर्नाटकातील लोकसभा जागावाटपासंदर्भात बैठक झाली. जेडीएसच्या मागणीवर लवकरच दहा मार्चपर्यंत निर्णय होईल, असे जेडीएसच्या अध्यक्षांनी सांगितले. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत कर्नाटकातील राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला कर्नाटकाचे कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि जेडीएसचे सरचिटणीस दानिश अली उपस्थित होते. देवेगौडा म्हणाले, की आम्ही बारा जागांची मागणी केली होती. मात्र, किमान दहा जागा तरी जेडीएसला सोडाव्यात अशी विनंती राहुल गांधी यांना केली आहे. कर्नाटकात सध्या कॉंग्रेस- जेडीएस आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्रिपद जेडीएसचे नेते आणि देवगौडा यांचे चिरंजीव एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com