आता काँग्रेसशी 'हात'मिळवणी नाही : देवेगौडा

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

आता आम्ही काँग्रेसशी कधीही आघाडी करणार नाही, असे माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आता आम्ही काँग्रेसशी कधीही आघाडी करणार नाही, असे माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले. काँग्रेससोबत आघाडी करण्याची चूक आता आम्ही परत करणार नाही, असेही देवेगौडा यांनी सांगितले. 

कर्नाटकात सत्तेवर असलेले एचडी कुमारस्वामी यांचे सरकार काही दिवसांपूर्वी भाजपने पाडत 'ऑपरेशन लोटस' यशस्वी केले होते. त्यानंतर आता खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनी यापुढे काँग्रेससोबत युती करणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले, यापूर्वी काँग्रेससोबत आघाडी करून जी चूक केली ती चूक परत करणार नाही. सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढू, असेही ते म्हणाले. 

राजस्थानमध्ये मायवतींना झटका; आमदारांनी घेतला परस्पर मोठा निर्णय |

कर्नाटकात मध्यावधी निवडणूक

राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यास आम्ही तयार राहू.

बरं झालं माझ्या जातीला आरक्षण नाही’; नितीन गडकरींची भावना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deve Gowda Says JDS Will Go Solo in Future Polls