विकासाबरोबर लष्करसज्जता महत्त्वाची: राजगोपाल चिदंबरम

पीटीआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

विकासाबरोबर त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे असून राष्ट्रीय विकास व राष्ट्रीय सुरक्षा या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला इतर देशांकडून खैरात नको असून या क्षेत्रात द्विपक्षी संबंध आणि भागीदारीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे

 

तिरुपती - विकासाबरोबर भारताने लष्करीदृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे आहे, असे मत सरकारचे विज्ञानविषयक सल्लागार व शास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम यांनी व्यक्त केले.

भारतीय विज्ञान कॉंग्रेस संस्थेत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. चिदंबरम म्हणाले, ""विकासाबरोबर त्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे असून राष्ट्रीय विकास व राष्ट्रीय सुरक्षा या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला इतर देशांकडून खैरात नको असून या क्षेत्रात द्विपक्षी संबंध आणि भागीदारीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.''

विविध मोठ्या प्रकल्पांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग असून शेजारील देशांना सुनामीचा इशारा देण्याची जबाबदारी युनेस्कोने भारताकडे सोपविली असल्याची माहिती चिदंबरम यांनी या वेळी बोलताना दिली.

Web Title: Development should be backed by strong military