कमी बॅगेज नेण्याचा होईल फायदा; विमान भाड्यात मिळणार सूट

Flight
Flight

नवी दिल्ली - प्रवासावेळी अनेकांना भरगच्च बॅगा घेऊन जाण्याची सवय असते. तर काही जण खूप कमी साहित्य नेतात. खरंतर प्रवासात हलक्या वजनाच्या बॅग सोबत असणं कधीही चांगलं असतं. आपल्याला प्रवासात त्या वाहून नेण्यासाठी जास्त त्रास होत नाही हा एक फायदा असतो. तसंच आता आणखी एक फायदा यामुळे होऊ शकतो. लवकरच देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाड्यामध्ये सूट मिळू शकते. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एविएशनच्या कार्यालयाने एक पत्रक जारी केले आहे. त्यात देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना असं सांगितलं आहे की, कमी बॅगेज असलेल्या प्रवाशांसाठी अशी व्यवस्था असायला हवी. 

डीजीसीएने झिरो बॅगेज, नो बॅगेज पॉलिसी अंतर्गत प्रवाशांना भाड्यात सूट देण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात ही सूट द्यायची की नाही, किती द्यायची याचा निर्णय कंपन्यांवर सोडला आहे. झीरो बॅगेज, नो बॅगेज पॉसलिसीबाबत डीजीसीएनं म्हटलं की, जो लोक फक्त केबिन बॅगेज घेऊन जातात त्यांना भाड्यात सूट मिळेल. 

एअरलाइन्सचा नियम काय
विमान प्रवास करत असताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. यामध्ये प्रवासात किती वजनाचे साहित्य सोबत असयाला हवे याचेही काही नियम आहेत. विमान प्रवाशाला 15 किलो वजनाच्या बॅगेजशिवाय आणखी साहित्य न्यायचं असेल तर त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील. 7 किलो हँडबॅग आणि 15 किलोचं चेकइन बॅगेज प्रवाशांना घेऊन जाता येतं.

आता जे प्रवाशी फक्त केबिन बॅगेज घेऊन प्रवास करतील त्यांना प्रवास भाड्यात सूट मिळू शकते. आता याची अंमलबजावणी होण्याआधी प्रवाशांना तिकिट बुकिंगवेळीच माहिती द्यावी लागेल की, तुम्ही चेक इन बॅगेज न घेता गेलात तर तुम्हाला प्रवास भाड्यात सूट मिळेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com