Air India : वैमानिकाची कॉकपिटमधील गर्लफ्रेंड भेट एअर इंडियाला पडली 30 लाखांत; दोघे तीन तास होते सोबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

Air India : वैमानिकाची कॉकपिटमधील गर्लफ्रेंड भेट एअर इंडियाला पडली 30 लाखांत; दोघे तीन तास होते सोबत

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात फेब्रुवारी महिन्यात एक धक्कादायक घटना घडली होती. एका वैमानिकाने आपल्या गर्लफ्रेंडला थेट कॉकपिटमध्ये बोलावून घेतलं. त्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता एअर इंडियाला मोठा भूर्दंड बसला आहे.

२७ फेब्रुवारीला दुबईहून दिल्लीकडे उड्डाण घेतल्यानंतर पायलटने त्याच विमानातून प्रवास करणाऱ्या आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावलं. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सुमारे तीन तास कॉकपिटमध्ये बसली होती. एका या अधिकाऱ्याने सांगितले की, वैमानिकाची ही कृती केवळ सुरक्षिततेचा भंग नाही तर एक वेडेपणा देखील आहे. ज्यामुळे विमान आणि त्याच्या प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकत होता.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. ही घटना हवाई वाहतूक नियामक डीजीसीएच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारी आहे. याप्रकरणी आता एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, सदरील वैमानिकाला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या घटना इथून पुढे घडता कामा नयेत, असा सज्जड दम डीजीसीएने एअर इंडियाला दिला आहे. शिवाय त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Air India