नियमांच्या उल्लंघनप्रकरणी एअर एशियाचे दोघे निलंबित

flight
flight

नवी दिल्ली - हवाई नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डिजीसीएने काल एअर एशियाचे दोन वरिष्ठ अधिकारी  हेड ऑफ ऑपरेशन्सचे कॅप्टन मनीष उप्पल आणि चिफ ऑफ फ्लाइट सेफ्टी कॅप्टन मुकेश नीमा यांना निलंबित केले. यासंदर्भात डिजीसीएने २८ जून रोजी एअर एशिया इंडियाला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.  

एअर एशिया इंडियाच्या एका माजी वैमानिकांने दोन महिन्यांपूर्वी नोकरीत असताना एअरलाइन्स कंपनीवर सुरक्षा नियमांशी तडजोड केल्याचा आरोप केला होता. संबंधित वैमानिक प्रसिद्ध यूट्यूबर आहे आणि फ्लाइंग बिस्ट नावाने त्याचे यूट्यूबवर चॅनेल देखील आहे. यूट्यूबर कॅप्टन गौरव तनेजा निलंबित वैमानिक आहेत. त्यांनी १४ जून रोजी ट्विट करत  सुरक्षित उड्डाण आणि प्रवाशांना आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित केल्यामुळे कारवाई केल्याचे सांगितले. तनेजाच्या म्हणण्यानुसार, विमान कंपनी त्यांच्या वैमानिकास इंधन वाचवण्यासाठी ९८ टक्के लँडिंग फ्लॅप ३ मोडवर करण्यास सांगते. जर वैमानिकाने अशी कृती न केल्यास एसओपीचे उल्लंघन केल्याचा ठपका कंपनीकडून ठेवला जात असे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com