भाजपच्यां महिला खासदाराची पोलिसाला धमकी; नाही सुधारला तर मारून टाकेन

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

या कार्यक्रमानंतर रात्री 11 वाजता त्या परत निघाल्या असताना त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांची एका गाडी पाठवण्यात आली होती. पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर रेखा वर्मा बाहेर पडल्यानंतर सुरक्षेसाठी पाठवण्यात आलेले पोलिस आपल्या गाडीने परत निघाले.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील धौरहरा येथील भाजप खासदार रेखा वर्मा यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलच्या थोबाडीत मारत 'सुधर जाओ वरना मरवा दूंगी,' अशी धमकी दिली आहे. असा आरोप कॉन्स्टेबल श्याम सिंह यांनी केला असून खासदार रेखा वर्मा यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या कॉन्स्टेबलने आत्मदहन करण्याची धमकी दिल्यानंतर भाजप खासदाराविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. मोहम्मदी येथे रविवारी सायंकाळी भाजपच्या वतीने सन्मान सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खासदार रेखा वर्मा उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर रात्री 11 वाजता त्या परत निघाल्या असताना त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांची एका गाडी पाठवण्यात आली होती. पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर रेखा वर्मा बाहेर पडल्यानंतर सुरक्षेसाठी पाठवण्यात आलेले पोलिस आपल्या गाडीने परत निघाले. तेवढ्यात खासदार वर्मा यांची गाडी परत आली आणि पोलिस गाडीचे चालक कॉन्स्टेबल श्याम सिंह यांना जवळ बोलावून थोबाडीत मारत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up dhaurahra lok sabha seat rekha verma slapped constable