धोनीची वैयक्तिक माहिती लीक; साक्षीचा मंत्र्यांवर संताप

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

धोनीची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा आधार कार्डच्या प्रमोशन कार्यक्रमात प्रकार घडला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन धोनीच्या आधार कार्डची कॉपी ट्वीट करण्यात आली.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वैयक्तिक माहिती लीक झाल्याने त्याची पत्नी साक्षीने माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. प्रसाद यांनीही धोनीची माहिती हटविण्याचे आदेश दिले.

धोनीची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा आधार कार्डच्या प्रमोशन कार्यक्रमात प्रकार घडला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन धोनीच्या आधार कार्डची कॉपी ट्वीट करण्यात आली. त्यानंतर प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का, असा प्रश्न ट्विटवरून साक्षीने रवीशंकर प्रसाद यांना केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे लोक धोनीच्या घरी जाऊन, तो आधार कार्डचा वापर कसा करतो, त्याची माहिती अपडेट करत होते. अशाच एका ट्वीटमध्ये धोनीचा आधार कार्ड फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला. ज्यावर साक्षीने आक्षेप घेतला.

साक्षीच्या ट्विटला प्रसाद यांनीही तातडीने उत्तर देत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटमधून काही वैयक्तिक माहिती लीक झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर साक्षीने आधार कार्ड फॉर्ममध्ये वैयक्तीक माहिती भरलेली आहे. तो फॉर्म अपलोड करण्यात आल्याचे सांगितल्यानंतर प्रसाद यांनी याची तातडीने दखल घेत ट्विट हटवण्यास सांगितले. तसेच हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.

Web Title: Dhoni's Aadhaar Details Leaked, Wife Sakshi Takes on Ravi Shankar Prasad