'धृतराष्ट्र' निवडणूक आयोगाला वाटते भाजपनेच जिंकावे- केजरीवाल
दिल्लीत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राजस्थानमधूनच ईव्हीएम आणण्यात येणार आहेत. दिल्लीतील मशीन्स रद्द करून राजस्थानमधूनच का आणण्यात येत आहेत.
नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सवरून (ईव्हीएम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य करत, आयोग हे 'धृतराष्ट्र' असून त्यांना फक्त 'दुर्योधन' भाजप जिंकावे असेच वाटते.
ईव्हीएममध्ये गडबड गेल्याने पंजाब आणि गोवामध्ये पराभव झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी यापूर्वी केला होता. आता पुन्हा एकदा केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाची थेट धृतराष्ट्राशी तुलना करत ते आपला मुलगा दुर्योधनाला वाचविण्यासाठी या मशीन्सचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले, की निवडणूक आयोगाला त्यांचा मुलगा भाजप कोणत्या परिस्थितीत जिंकलेला हवा आहे. निवडणुका आयोगाचा निवडणुका घेण्यापेक्षा भाजपला विजय मिळवून देण्याचाच हेतू आहे. राजस्थानमधील धौलपूर पोटनिवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएमपैकी काही मशिन्समध्ये फेरफार करण्यात आले होते. दिल्लीत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी राजस्थानमधूनच ईव्हीएम आणण्यात येणार आहेत. दिल्लीतील मशीन्स रद्द करून राजस्थानमधूनच का आणण्यात येत आहेत.