डायना हेडन विश्‍वसुंदरी झालीच कशी? : देव 

Diana Hedan World Beautiful says Vipalav Dev
Diana Hedan World Beautiful says Vipalav Dev

आगरतळा : "सौंदर्य स्पर्धा बोगस असून 21 वर्षांपूर्वी डायना हेडन विश्‍वसुंदरी झालीच कशी?' असा प्रश्‍न त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

बेजबाबदार विधाने करू नका, अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भाजपच्या नेत्यांना दिली होती. त्याच्या काही तासांतच विप्लवकुमार यांनी हे वक्तव्य केले आहे. महाभारत काळात इंटरनेटचा वापर केला जायचा असे विधान काही दिवसांपूर्वी देव यांनी केले होते. 

"अभिनेत्री ऐश्वर्या राय ही खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते. आम्ही महिलांना लक्ष्मी, सरस्वतीप्रमाणे देवी मानतो. ती विश्वसुंदरी झाली. पण डायना हेडन विश्वसुंदरी झालीच कशी,'' असे म्हणत विप्लवकुमार यांनी सौंदर्य स्पर्धांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "भारतातील अनेकांनी मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. पण हा किताब डायनाला मिळायला हवा होता का?'' असे ते म्हणाले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com