Atal Bihari Vajpayee: 'त्या'मुळे वाजपेयी राहिले अविवाहीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता.

वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याचे उत्तर दिले होते.

पाचवीमध्ये शिक्षण घेत असताना वर्गात शिक्षकाने थप्पड मारलेला क्षण आयुष्यातील सर्वात कटु क्षण होता. कविता करत असतानाच राजकारणाकडे वळालो. राजकारण आणि कवितेमुळे वेळच मिळत नव्हता. आयुष्यात खुप चढ-उतार आले पण माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले, हा क्षण सर्वांत आनंदाचा होता, असे मुलाखतीदरम्यान वाजपेयी यांनी सांगितले होते.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी राष्ट्रपती भैरवसिंग शेखावत, अप्पा घताते, जसवंतसिंग, डॉ. मुकुंद मोदी व व शिवकुमार हे माझे जिवलग मित्र आहेत. माझ्या यशाचे श्रेय हे वडील क्रिष्णा बिहारी वाजपेयी, गुरु गोळवलकरजी, पंडित दीन दयाळ उपाध्याय व संघाचे भाऊराव देवरास यांना जाते. पंडित दीन दयाळ उपाध्याय यांचे निधन झाले तेंव्हाचा क्षण सर्वांत दुःखाचा क्षण होता, असेही वाजपेयी यांनी सांगितले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे आवडते नेते होते. शरतचंद्र व प्रेमचंद हे आवडते लेखक तर हरिवंशराय बच्चन हे आवडते कवी होते. अभिनेते संजीव कुमार, दिलीप कुमार, सुचित्रा सेन, राखी व नुतन हे आवडते होते. कभी कभी मेरे दिल मे..., ओ मेरे माझी..., सुन मेरे बंधू रे.... ही आवडती गाणी. देवदास, बंदिनी, तिसरी कसम, मौसम, ममता ऍण्ड आंधी हे आवडते चित्रपट असून अनेकदा पाहिल्याचे वाजपेयींनी सांगितले. वडिलांसोबत वसतीगृहात रहात असताना जेवण तयार करायला शिकलो. एवढे सर्व काही करत असताना विवाह करण्यास वेळ मिळालाच नाही, असे वाजपेयी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

Web Title: did not get time to marry say Atal Bihari Vajpayee