सर्जिकल स्ट्राइकवेळी राहुल गांधींना सोबत घ्यायचे होते का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना सैन्याने मोहीमेवर जाताना सोबत घेऊन जायचे होते का?

गोवा : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी अविश्वास दाखविणाऱ्या विरोधकांवर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चांगलाच निशाना साधला. 

पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना सैन्याने मोहीमेवर जाताना सोबत घेऊन जायचे होते का?

भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पर्रिकर बोलत होते. सर्जिकल स्ट्राइकवर राजकारण करण्याच्या भावनेतून बोलत नाही. विरोधी पक्ष सर्जिकल स्ट्राइकच झाली नसल्याचा दावा करतात. त्यांची ही नकारात्मकता पाहून असे वाटते, विरोधकांनाही सोबत घेऊन जायला हवे होते. सैन्याला सांगायला पाहिजे होते की राहुल गांधी यांनाही सर्जिकल स्ट्राइक मोहीम फत्ते करण्यासाठी घेऊन जा. असेही पर्रिकर म्हणाले.

या मोहीमे विषयी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी, सैन्य प्रमुख आणि सैन्य महानिदेश अशी चौघांनाच या कारवाईची माहिती होती. अशा विषयांना अतिशय गोपनीय ठेवावे लागते. आम्ही चौघे दिल्लीत होतो आणि ज्यांनी ही मोहीम फत्ते केली ते सेना कमांडर आणि जवान श्रीनगर मध्ये होते. संप्टेंबर 2016 मध्ये भारतीय सैन्याने एलओसी पार करून सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षण मंत्री होते.
 

Web Title: Did Rahul Gandhi want to accompany him during a surgical strike?