शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ थेट पोलिस उपमहानिरीक्षकाचाच राजीनामा; सरकारी नोकरी सोडून उतरले आंदोलनात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

राजकारणापासून ते क्रिडा-कला क्षेत्रातील अनेकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपला आवाज उठवला आहे. 

चदींगढ : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार  परत केले होते. या अवार्डवापसीनंतर आता राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. पंजाब राज्यातील डीआयजी जेलचे लखविंदर सिंह जाखड यांनी आपला राजीनामा पंजाब सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याने लखविंदर सिंह जाखड सध्या चर्चेत आले आहेत. या राजीनाम्याचे कारण त्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन असं दिलं आहे. एडीजीपी (जेल) पीके सिन्हा यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची एक प्रत त्यांना देखील पाठवली आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांसहित अनेक दिग्गजांनी केली अवार्डवापसी
पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाला भरपूर समर्थन मिळत आहे. राजकारणापासून ते क्रिडा-कला क्षेत्रातील अनेकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपला आवाज उठवला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्म विभूषण आणि राज्यसभेचे खासदार सुखदेव सिंह ढींढसा यांनी देखील पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. तर पंजाबीमध्ये साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते पंजाबचे प्रसिद्ध शायर डॉ. मोहनजीत, प्रख्यात विचारवंत डॉ. जसविंदर सिंह आणि पंजाबी नाटककार तसेच एका वृत्तपत्राच्या संपादकांनी देखील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपले पुरस्कार परत करण्याची घोषणा याआधीच केली आहे. 

हेही वाचा - ...तर ममता बॅनर्जींचा खून केला जाऊ शकतो; TMC च्या मंत्र्याचा आरोप​
पंजाबच्या 27 खेळाडूंनी केली अवार्डवापसीची घोषणा
हॉकीचे माजी कॅप्टन परगट सिंहसमवेत पंजाबच्या 27 खेळाडूंनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ याआधी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. या यादीमध्ये करतार सिंह पहलवान, ब्रिगेडियर हरचरण सिंह, दविंदर सिंग गरचा, सुरिंदर सोढ़ी, गुनदीप कुमार, सुशील कोहली, मुखबैन सिंह, कर्नल बलबीर सिंह, गुरमैल सिंह, गोल्डन गर्ल रादबीर कौर, जगदीश सिंह, बलदेव सिंह, अजीत सिंह, हरमीक सिंह, अजीत पाल सिंह, चंचल रंधावा, सज्जन सिंह चीमा, हरदीप सिंह, अजैब सिंह, शाम लाल, हरविंदर सिंह, हरमिंदर सिंह, सुमन शर्मा, प्रेमचंद डोगरा, बलविंदर सिंह आणि सरोज बाला या खेळांडूच्या नावाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DIG punjab lakhwinder singh jakhar gave resignation in support of farmers protest