दिगंबर कामतांना 'SIT'चे समन्स

पीटीआय
रविवार, 16 एप्रिल 2017

2013 मधील बेकायदा खाणप्रकरणी कामत यांनी "एसआयटी'समोर हजर राहावे, असे समन्स त्यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

पणजी : गोवा गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

2013 मधील बेकायदा खाणप्रकरणी कामत यांनी "एसआयटी'समोर हजर राहावे, असे समन्स त्यांना बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. कामत यांना याप्रकरणी दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. कामत यांच्याबरोबरच गोव्याच्या खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांनाही समन्स बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोलयेकर यांना याप्रकरणी 2014 मध्ये अटक झाली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली असतानाही 2005 ते 2012 या कालावधीमध्ये गोव्यातून 35 हजार कोटी रुपयांचे बेकायदा खाणकाम झाल्याचा अहवाल आहे.
 

Web Title: digambar kamat summoned by SIT