किशोरीताईंच्या निधनाने हळहळले रसिक अन् मान्यवर

टीम ई सकाळ
मंगळवार, 4 एप्रिल 2017

किशोरी अमोणकर यांच्या आठवणी पाठवा 

तब्बल 55 वर्षे शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर जगभर विविध ठिकाणी त्यांनी गायनाच्या बहारदार मैफिली सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ऐकले आहेत का तुम्ही किशोरीताईंचे कार्यक्रम? कधी झाला आहात का त्यांच्या मैफिलीत मंत्रमुग्ध? मग लिहा आणि पाठवा "ई सकाळ'कडे. कळू द्या जगाला तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेली त्यांची कला! 

1) तुमच्या आठवणी webeditor@esakal.com वर पाठवा. 
2) सब्जेक्‍टमध्ये 'किशोरी अमोणकर यांच्या आठवणी' असे लिहा. सोबत काही छायाचित्रे असतील तर अवश्‍य पाठवा. 
3) आठवणी जास्तीत जास्त 500 शब्दांपर्यंत असाव्यात. 
3) तुम्ही 'सकाळ संवाद' ऍपच्या माध्यमातूनही तुम्ही आठवणी पाठवू शकता.

'सकाळ संवाद' ऍप डाऊनलोड करण्यासाठी क्‍लिक करा : https://goo.gl/sjpnAW

‘गानसरस्वती’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'सकाळी सकाळी सर्वांत वाईट वृत्त कळले..', 'किशारीताई आपल्याला सोडून गेल्या, परंतु त्यांचा आवाज सोबत राहील,' अशा भावना रसिकांनी व्यक्त केल्या. 

किशोरी आमोणकरजी यांचा स्वर्गवास झाल्याचं ऐकून मला अत्यंत दुःख झालं. त्या एक असामान्य गायिका होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 
- गानकोकिळा लता मंगेशकर 

‘किशोरी आमोणकर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचं अतोनात नुकसान झालं. त्यांची गायकी कायम स्मरणात राहील.’
- प्रसिद्ध गायक शंकर महादेवन 

अमोणकरांचे यांचे कार्य पुढील काळातही नेहमीच लोकप्रिय राहील. निधन हे भारतीय शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान आहे. 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

किशोरी अमोणकरांच्या जाण्याने अतीव दुःख झालंय. भारतीय शास्त्रीय संगीताचं न भरून निघणारे नुकसान झालं आहे. 
- शरद पवार

किशोरी अमोणकरांच्या तेजाशिवाय संगीताचे विश्व अंधारून जाते. महान आत्म्याला शांती लाभो. 
- गायक विशाल ददलानी

ख्यात हिंदुस्तानी क्लासिकल गायिकेच्या निधनाने तीव्र दुःख झाले. 
- बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय कामगार राज्यमंत्री

भारतीय शास्त्रीय संगीतातला चमकता तारा निखळला. 
- संगीतकार ऐहसान नुरानी

थोर गायिक किशोरी अमोणकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
- सरोद वादक अमजद अली खान

किशोरीजी आपल्याला सोडून गेल्या. त्यांचे संगीत अमर आहे. पुढील पिढ्यांवर त्यांचा प्रभाव कायम राहील. त्या आपल्या भारतरत्न आहेत. त्यांची आठवण येत राहील.
- संगीतकार सलीम मर्चंट
 

किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने प्रयोगशीलता व संवेदनांना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Web Title: dignitaries pay tribute to kishori amonkar