भैय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येवर मान्यवरांच्या प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येबद्दल दुखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत

पुणे- राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी का मारली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली.

महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येबद्दल दुखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भैय्यूजी महाराजांची आत्महत्या ही वेदनादायी आहे. त्यांनी परळीत कृषी केंद्र उभा करण्याचे काम केले आहे. अशी भावना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भैय्यूजी महाराज यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी मराठवाड्यात जलसंधारणाचे मोठे काम केले, आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते माधव भंडारी यांनी व्यक्त केली. राजकीय क्षेत्रात भैय्यूजी महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबध असल्याचे मत गिरिश महाजन यांनी व्यत केले आहे.  
 

Web Title: dignitaries statement on bhayyuji maharaj sucide