अटक झालेले हिंदू दहशतवादी संघाचेच - दिग्विजय सिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

आजपर्यंत पकडले गेलेल्या हिंदू दहशतवाद्यांचा संबध हा आरएसएससोबत होता, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी याप्रकारचे वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला आहे. ते आज झाबुआ येथे माध्यमांशी बोलत होते.

नवी दिल्ली - आजपर्यंत पकडले गेलेल्या हिंदू दहशतवाद्यांचा संबध हा आरएसएससोबत होता, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या दिग्विजय सिंह यांनी याप्रकारचे वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला आहे. ते आज झाबुआ येथे माध्यमांशी बोलत होते.

सिंग म्हणाले की, महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचाही संबध संघाशी होता. संघाची विचारधारा घृणा पसरवणारी आहे. घृणा हिंसेला प्रेरणा देते आणि हिच हिंसा माणसाला दहशतवादाकडे घेऊन जाते. दिग्विजय सिंह यांनी संघावर आरोप करताना संघाचा उल्लेख दहशतवादाला प्रेरणा देणारी संघटना असा केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांना अमेरिकन एजन्सीने आतंकवादी संघटना घोषित केले होते. तर, आरएसएसला राष्ट्रवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यासंबधित माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंह यांनी असे वक्तव्य केले आहे. 

दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी मी हिंदू दहशतवाद नाहीतर, संघी दहशतवाद असा शब्दप्रयोग करतो असे वक्तव्य केले होते. त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्यांच्या या वक्तव्यानेही मोठा वाद निर्माण होण्याची श्यक्यता आहे.

Web Title: digvijay singh said all hindu terrorists were linked to rss