'अमेरिका लादेनबाबत पुरावे देऊ शकतं तर आपण का नाही?'

'अमेरिका लादेनबाबत पुरावे देऊ शकतं तर आपण का नाही?'

भोपाळ- 'आताचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. अमेरिकेनं दहशतवादी लादेनचा खात्मा केल्यानंतर याबाबत पुरावे दिले. सॅटेलाईटद्वारे मिळणाऱ्या फोटोंच्या साहाय्याने आपणही एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत,' असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. त्यानंतर या हल्ल्याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. हल्ला केला तर पुरावेही बाहेर आणा, अशी प्रतिक्रिया देशातील अनेक नेत्यांनी दिली. अशातच आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शनिवारी इंदोरमध्ये दिग्विजय सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याबदद्ल कौतुकही केले. इम्रान खान यांनी चांगले शेजारी असण्याचा नवा मार्ग दाखवला आणि आमचा शूर अधिकारी आम्हाला परत केला. आता त्यांनी अजून थोडी हिंमत दाखवावी आणि हाफिज सईद आणि मसूद अजहर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांनाही भारताच्या हवाली करावं असंही सिंह म्हणाले.

तसेच ते यावेळी बोलताना म्हणाले की, इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईबाबत कोणतीही शंका नाही पण, सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळे उपग्रहाद्वारे छायाचित्रे शक्य आहेत. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने जगासमोर त्याच्या खात्म्याबाबतचे भक्कम पुरावे सादर केले होते. भारतानेही एअर स्ट्राइकचे पुरावे जगासमोर सादर करावेत असं सिंह म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com