...तर 2024 च्या निवडणुका अखेरच्या ठरतील; काँग्रेस नेत्याने व्यक्त केली चिंता

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 31 August 2020

 

दिग्विजय सिंह यांनी कॅरल कॅडवॉलर (Carole Cadwalladr) यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्या फेसबुकच्या माध्यमातून केंब्रिज अ‍ॅनालिटिकामुळे निवडणुकांवर कसा प्रभाव पडू शकतो यावर भाष्य केले आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेता दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पुन्हा एकदा  EVM चा मुद्दा उपस्थितीत केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत भारतातील राजकारणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. इलेक्टॉनिक मतदान यंत्राने (EVM) भारतीय लोकशाहीला उद्धवस्त केलं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संसदीय निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु आहे, असे मत त्यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केले आहे. 2024 मध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले नाही तर ही निवडणूक भारतीय राजकाणातील अखेरची निवडणूक ठरेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. 

दिग्विजय सिंह यांनी कॅरल कॅडवॉलर (Carole Cadwalladr) यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये त्या फेसबुकच्या माध्यमातून केंब्रिज अ‍ॅनालिटिकामुळे निवडणुकांवर कसा प्रभाव पडू शकतो यावर भाष्य केले आहे. कॅरल कॅडवॉलर यांनी यासंदर्भातील छोटी क्लिप ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 6 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओत तंत्रज्ञानाच्या जोरावर निवडणुकीमध्ये होणारी हेराफेरीबद्दल विश्लेषण करताना दिसते.  

2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी EVM च्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांवर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला होता. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत या मुद्यावर विरोधकांनी एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्नही केला होता. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, अशी मागणी करण्यात आली. हा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र निवडणुका या EVM च्या माध्यमातूनच पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्विवादपणे यश मिळवले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digvijay singh twitter reaction carole cadwalladr over evm use in 2024 loksabha election